Share

‘किचन कल्लाकार’च्या सेटवर राजकारणातील पंकजा मुंडेसह रोहित पवार, प्रणिती या नेत्यांची रंगली संगीत खूर्ची

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार म्हणत संकर्षणच्या (Sankarshana ) विनोदाची फोडणी असलेला झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात भाजप नेत्या  पंकजा मुंडे (BJP leader Pankaja Munde), राष्ट्रवादी आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Congress MLA Praniti Shinde) या नेते मंडळींनी या सेटवर हजेरी लावली.

या शोमध्ये एकीकडे राजकारणातील डावपेच आणि दुसरीकडे विनोदाचे पंच अशा या विशेष शोच्या आगामी भागासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे, रोहित पवार आणि प्रणिती शिंदे यांनी हजेरी लावून चारचाँद लावले. झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ (‘Kitchen Kallakar’) या नवीन कुकरी शो मध्ये महाराज म्हणजेच प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी या तिन्ही नेत्यांना महाराजांच्या आवडीचे पदार्थ करायचं आव्हान दिलं आणि सुरु झाली एक स्पर्धा, पण महाराजांच्या आवडीचे हे पदार्थ तयार करत असताना विनादाची फोडणी देत टास्क करावं लागणार आहे.

यावेळी या तिघांनी सुद्धा मस्त मजेदार किस्से या भागात सांगितले. या भागात एक विसरलेला सामान मिळवण्यासाठी एक अनोखा संगीतखुर्चीचा सामना देखील रंगला. पंकजा मुंडे यांची गटारी अमावास्येला काय फजिती झाली? प्रणिती शिंदे यांनी पायलट सारखी घोषणा कशी केली? रोहित पवार यांनी कार्यक्रमात एका खेळात खुर्चीचा त्याग केला आणि मग काय गुगली टाकली? हे जाणून घेण्यासाठी हा रंजक भाग चुकवू नका. तेव्हा पाहायला विसरू नका ‘मस्त मजेदार किचन कल्लाकार’ ५ आणि ६ जानेवारी बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!