मुंबई : महाराष्ट्रात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग खुला झाला आहे. आज सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणावर सुनावणी झाली. खानविलकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. निवडणूक आयोगाने प्रभाग पुनर्रचनेच्या मुद्द्यावर लक्ष घालावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दोन आठवड्यांत निवडणुका जाहीर कराव्यात, असे न्यायालयाने स्पष्ट केले, त्यामुळे महापालिका आणि अन्य राज्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. बांठिया आयोगानुसार निवडणुका घ्याव्यात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाविकास आघाडी चे अभिनंदन केले आहे.
“ओबीसींना २७% आरक्षण देण्याबाबत बांठिया आयोग मविआ सरकारने नेमला होता. त्या आयोगाच्या अहवालानुसार राज्यात निवडणुका घेण्याचं कोर्टाने सांगितले आहे. महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना यश आले. मविआ आघाडी सरकारचे हार्दिक अभिनंदन”, असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे.
ओबीसींना २७% आरक्षण देण्याबाबत बांठिया आयोग मविआ सरकारने नेमला होता. त्या आयोगाच्या अहवालानुसार राज्यात निवडणुका घेण्याचं कोर्टाने सांगितले आहे. महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना यश आले. मविआ आघाडी सरकारचे हार्दिक अभिनंदन ..@uddhavthackeray@AjitPawarSpeaks @ChhaganCBhujbal
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 20, 2022
आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले, “मविआने नेमलेल्या बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत येत्या दोन आठवड्यात ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला, हा तत्कालीन मविआ सरकारचा विजय असून ओबीसी बांधवांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळतंय, याचा मनापासून आनंद आहे.”
“बांठीया आयोग स्थापन करुन ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी मविआ सरकार असताना प्रामाणिक प्रयत्न केला गेला. आजचा निकाल हे या प्रामाणिक प्रयत्नांचं फलित आहे. याबाबत तत्कालीन मविआ सरकारचे आभार आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत,” असे रोहित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Pankaja Munde : “राजकीय भविष्यावरील टांगती तलवार दूर”, ओबीसी आरक्षणावरील निर्णयानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया
- Virat Kohli : विराट कोहलीच्या भन्नाट स्टाईलने जिंकली चाहत्यांची मने; पाहा ‘हा’ VIDEO!
- Arvind Sawant : सुप्रीम कोर्टातील निर्णयानंतर खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया
- Ulhas Bapat | “…तर सरकार बरखास्त होऊ शकतं” ; कायदेतज्ञ उल्हास बापट यांची महत्वाची माहिती
- Navneet Rana : संजय पांडेंनंतर संजय राऊत आणि अनिल परब यांना अटक होणार; नवनीत राणा यांच्या विधानाने खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

