🕒 1 min read
मुंबई : आज महाविकास आघाडी सरकारनं नेमलेल्या बांठिया आयोगाचा अहवाल राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सादर केला. हा अहवाल सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारला आहे. यानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने आज बांठिया आयोगाचा अहवाल मान्य केला असून या अहवालानुसार निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. यानंतर यावरून राजकीय वर्तुळात आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी दिलेला मानवतेचा, सामाजिक न्यायाचा विचार महाराष्ट्रात सदैव जिवंत राहील, हा विश्वास सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयातून पुन्हा एकदा दृढ झाला आहे. महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या कल्याणासाठी घेतेलेले निर्णय व सुरु केलेल्या योजना यापुढेही सुरु राहतील, याची काळजी विरोधी पक्ष म्हणून आम्ही निश्चित घेऊ, राज्यातील ओबीसी बांधवांच्या एकजुटीतून तसंच संपूर्ण महाराष्ट्रानं ओबीसी आरक्षणाला दिलेल्या एकमुखी पाठिंब्याच्या बळावर हे यश मिळालं आहे. महाराष्ट्राची ही एकजूट यापुढेही कायम ठेवूया अशा शब्दात अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
सर्वोच्च न्यायालयानं बांठिया आयोगाचा अहवाल मान्य करुन त्यानुसार स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तत्काळ घेण्याचा दिलेला आदेश हा राज्यातील ओबीसी बांधवांच्या हक्कांचा आणि महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या हक्कांसाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 20, 2022
आदरणीय शरद पवार साहेबांनी त्या काळात राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या बाजूनं ठाम भूमिका घेतली व राज्यात ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाला. ते आरक्षण अबाधित राहिलं, याचा आनंद आहे.ओबीसी आरक्षणासाठी ठाम भूमिका घेण्याचं काम आधीपासून आम्ही केलं. हीच भूमिका यापुढेही कायम राहील, असंही अजित पवार म्हणाले. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार तसंच अन्य नेत्यांनी ओबीसी आरक्षणासाठीची लढाई आज यशस्वी करुन दाखवली असल्याचे मत देखील अजित पवार यांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या :
- ऐकलं का! नीता अंबानींच्या रिलायन्सने विकत घेतली आणखी एक क्रिकेट टीम; नाव ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!
- New Delhi : १०० कोटींच्या मोबदल्यात मंत्रिपद, राहुल कुल आणि जयकुमार गोरेंची फसवणूक करण्याचा प्रयत्न
- OBC Reservation : आम्ही बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहोत, शब्द पाळणारच; ओबीसी आरक्षण मंजूरीनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
- Chhagan Bhujbal : सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर छगन भुजबळ यांची मोठी प्रतिक्रिया
- IND vs ZIM : टीम इंडिया ६ वर्षांत प्रथमच जाणार झिम्बाब्वे दौऱ्यावर; केएल राहुल करू शकतो पुनरागमन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
