Share

Kishori Pednekar । ‘खोके-धोके’ कोण कुणाला देतंय हे जनतेला ज्ञात; शहांच्या वक्तव्यावर पेडणेकरांचा पलटवार

Published On: 

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौरावर आहेत. यावेळी त्यांनी मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये भाष्य करत असताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच दोन्ही पक्षांनी मिळून 150 जागा जिंकण्याचं टार्गेट देखील दिलं आहे. याच टीकेवर शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार टीका केली आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या कि, भाजप पक्ष हा सत्तेसाठी कोणत्या स्थराला जाऊ शकतो हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अनेक राज्यामध्ये समोर आले आहे. राज्यात दोन महिन्यापूर्वी घडलेले राजकीय नाट्य हे कशासाठी झाले ते सर्व जनतेला माहित आहे. खोके कोणी कोणाला दिले आणि धोका कुणाबद्दल झाला हे आता नव्याने सांगायची गरज नाही. कोण कोणाला धोखा देतोय कोण कोणाला खोके देतोय कोण कोणाचे बोके पळवतोय हे माहीत असल्याचे सांगत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, खासदर अरविंद सामंत यांनी देखील निशाणा साधलाय. भाजपकडे नेहमीच कुठली ना कुठले मिशन असतात. मात्र, जनतेच्या मूळ समस्यांपासून ते मिसिंग असतात, अशी टीका सावंत यांनी केली आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्कातच होईल, असेही त्यांनी यावेळी ठासून म्हटलं आहे. आज काय लोटस मिशन, उद्या काय दुसरे मिशन, पण जे खरे प्रश्न आहेत त्यापासून ते मिसिंग असतात, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे. अनेक प्रश्न त्यातही जनतेच्या प्रश्नांपासून भाजपा दूर आहे, मराठी माणसांच्या अस्मितेपासून भाजप दूर आहे, मुंबई महापालिकेवर असलेले शिवसेनेचा भगवा झेंडा कोणीही हलवू शकत नाही, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!