Share

Nitin Gadkari | रस्ते अपघातांना निकृष्ट प्रकल्प अहवाल जबाबदार, नितीन गडकरींचा खुलासा

Published On: 

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी काही रस्ते अपघातांसाठी सदोष प्रकल्प अहवालांना जबाबदार धरलं आहे. तसेच महामार्ग आणि इतर रस्त्यांच्या बांधकामासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी कंपन्यांना योग्य प्रशिक्षण मिळणं आवश्यक आहे, यावर देखील त्यांनी भर दिला.

कंपन्यांनी तयार केलेले काही डीपीआर (तपशीलवार प्रकल्प अहवाल) अत्यंत वाईट आहेत आणि ते रस्ते अपघातांना जबाबदार आहेत. तसेच नवीन मर्सिडीज कार देखील अकुशल ड्रायव्हरच्या हातात दिल्यावर अडचणी निर्माण करू शकते. त्यामुळे गडकरींनी रस्ते प्रकल्पांना होणाऱ्या विलंबाची कारणं शोधण्यावर भर दिला, कारण विलंबामुळे बांधकामाचा वाढता खर्च ही देखील चिंतेची बाब आहे, असं गडकरींनी दिल्लीतील एका कार्यक्रमामध्ये म्हटलं आहे.

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये भारतभरात १.५५ लाखांहून अधिक लोकांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला – दररोज सरासरी ४२६ किंवा प्रत्येक तासाला १८ – आतापर्यंतच्या कोणत्याही कॅलेंडर वर्षात नोंदवलेला सर्वाधिक आहे.

दरम्यान, गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या NCRB च्या अहवालात असे दिसून आले आहे की गेल्या वर्षी अपघातांमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या उच्च पातळीवर पोहोचली आहे, तर रस्ते अपघात आणि जखमींची संख्या मागील वर्षांच्या तुलनेत कमी झाली आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!