🕒 1 min read
मुंबई : अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येऊन या निवडणुकीसाठी जोर लावला होता. मात्र, राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यावर भाजपने झेंडा फडकावल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे.
निकालाच्या दुसऱ्याच दिवशी नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी ‘ऍक्शन मोड’ मध्ये येऊन तालुक्यातील कोरोना स्थितीची आढावा बैठक घेतली होती. यासोबतच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सूचना देखील आवताडे यांनी दिल्या होत्या. दरम्यान, आज पंढरपूरमधल्या विजयानंतर समाधान आवताडे यांनी माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली आहे.
यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री बाळा भेगडे, सदाभाऊ खोत, भाजपचे संघटनमंत्री श्रीकांत भारतीय, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार राम सातपूते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी पंढरपूरच्या विजयाचे शिल्पकार व सोलापूरचे प्रभारी बाळा भेगडे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खास सत्कार देखील करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- अवघ्या ‘दिडशे रुपया’त पार पडलं ‘या’ अभिनेत्याचं लग्न
- 2021-22 मध्ये गहू खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 49 टक्के वाढ; रावसाहेब पाटील दानवे यांची माहिती
- ‘गडकरींकडे सूत्रे सोपवण्याची मागणी मोदींनी मान्य केली असती, तर ही वेळ आलीच नसती’
- ‘बंगाल जिंकण्याच्या आग्रहामुळे देश उद्ध्वस्त’, ममतांचा मोदींवर हल्लाबोल
- पार्सलची प्रतिक्षा नको… सरळ दुकानासमोर गर्दी करत तळीराम करताहेत खरेदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
