नवी दिल्ली : गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे(Corona) जनजीवन विस्कळीत झाले होते ते पूर्वपदावर येत असतानाच आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’(Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आता विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ.अमित द्रविड(Amit Dravid) यांनी नवा ओमायक्रॉन व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटची जागा घेत असल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आल्याची माहिती दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना द्रविड म्हणाले की,’ओमायक्रॉन व्हेरियंटमध्ये जवळपास ५० म्युटेशन्स पाहायला मिळत आहेत. जगभरात यापूर्वी डेल्टा व्हेरियंटने हाहाकार माजवला होता. भारतात दुसऱ्या लाटेत अनेकांना डेल्टा व्हेरियंटची लागण झाली. दक्षिण आफ्रिकेमध्येही डेल्टामुळेच तिसरी लाट आली होती. नवा ओमायक्रॉन व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटची जागा घेत असल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले आहे. तसेच ओमायक्रॉनमध्ये बहुतांश म्युटेशन स्पाईक प्रोटीनवर झालेले आहेत. लस, मोनोक्लोनल अँटीबॉडी जिथे काम करतात, तिथेच खूप म्युटेशन दिसून आली आहेत. विविध पध्दतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणांमध्ये दिसून आले की, ओमायक्रॉन व्हेरियंट सप्टेंबर – ऑक्टोबरपासून काही प्रमाणात विकसित झाला होता आणि आता त्याचा झपाट्याने प्रसार होत आहे.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचा ५ पट वेगाने प्रसार होत आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे एका रुग्णापासून तीन-चार जण बाधित होत असतील, तर ओमायक्रॉनचा एक रुग्ण १५ – २० जणांना बाधित करु शकतो. ओमायक्रॉन व्हेरियंट नवीन असल्याने त्यावर अनेक संशोधने सुरु आहेत. अभ्यासातून अंदाज बांधले जात आहेत. सुरुवातीला ओमायक्रॉन केवळ दक्षिण आफ्रिका आणि बोटस्वाना येथे आढळून आला होता. आता ३८ हून अधिक देशांमध्ये या व्हेरियंटने हात-पाय पसरले आहेत. दोन लसी घेतल्या असतील तर युकेमध्ये आरटीपीसीआर चाचणी न करता प्रवाशांना सोडले जाते. त्यामुळे अनेक प्रवाशांच्या माध्यमातून व्हेरियंटचा प्रादुर्भाव झालेला असू शकतो. स्कॉटलंडमध्ये आढळून आलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये दक्षिण आफ्रिकेला प्रवास केल्याचीही नोंद नाही. याचाच अर्थ स्कॉटलंडमध्ये कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात झाली आहे. नेदरलँडमध्ये आलेल्या ६० नागरिकांची दक्षिण आफ्रिकेत केलेली चाचणी निगेटिव्ह आली होती. नेदरलँडमध्ये गेल्यावर त्यातील १० टक्के लोक पॉझिटिव्ह आढळून आले. तसेच आता भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला आहे. भारतातही तो डेल्टा व्हेरियंटची जागा घेऊ शकतो,’ असेही द्रविड यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- चिंताजनक! राज्यात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या १० वर
- …तरी केंद्रातील विद्यमान सत्ताधारी जीएसटीच्या प्रेमात आकंठ बुडालेत- संजय राऊत
- शिवेंद्रराजे भोसलेंना शशिकांत शिंदेंचा खोचक टोला; म्हणाले,’माझी शिफारस नसल्यामुळे…’
- आम्ही राजकारणी तुला काही देऊ शकलो नाही; सूर्यकांता पाटलांची भावूक पोस्ट
- सदाभाऊ खोत यांचा ठाकरेंना टोला; म्हणाले, बिळातून बाहेर या आणि…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

