Share

Kishori Pednekar | मिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात जाणार का?, किशोरी पेडणेकर म्हणाल्या…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चम्पासिंग थापा यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) देखील शिंद गटात सहभागी होतील, असा दावा केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. अनेक चर्चांना देखील उधाण आलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर ?

किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. त्यावेळी त्यांना मिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात (Shinde Group) जाणार का?, असा सवाल करण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, मिलिंद नार्वेकरांसारखे नेते असं काही करतील यावर कुणाचाच विश्वास नाही.

पुढे बोलताना त्या असंही म्हणाल्या, कारण राज ठाकरे, नारायण राणे प्रचंड आरोप केले होते. त्यातूनही ते तावून सलाखून निघाले. आज ते तिरुपती सारख्या आध्यात्मिक संस्थेवर आहेत. त्यांची सद्बुद्धी नेहमीच चांगली असते. मात्र, आता ते शिंदे गटात जाणार की नाही याविषयी मला काहीही माहिती नाही.

दरम्यान, मिलिंद नर्वेकर उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला सोडून शिंदे गटात जाणार की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!