🕒 1 min read
मनमाड: केंद्र सरकारने केलेले कॉर्पोरेट धार्जिणे व शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा व शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला निर्णायकरित्या आणखी व्यापक करण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शनिवारी नाशिक ते मुंबई असा १५,००० शेतकऱ्यांचा भव्य राज्यव्यापी वाहन मोर्चा सुरु करण्यात आला आहे. नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथून नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीदिनी, सायंकाळी हा मोर्चा सुरू झाला.
तर याच दरम्यान दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून मनमाड येथील नांदगांव तालुका किसान सभेतर्फे भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. खादगाव येथून ही रॅली काढून मनमाड बाजार समितीच्या आवारात रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव उपस्थित होते. दिल्लीत सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात पंजाब आणि हरियाणा येथील शीख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यामुळे आज देशभरात यासाठी पाठिंबा म्हणून आंदोलन करण्यात आले. यास मनमाड गुरुद्वारा येथील प्रबंधक यांच्या नेतृत्वाखाली शीख बांधवांनी सहभाग नोंदवला होता.
या रॅलीचे नेतृत्व मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंग यांनी केले त्यांच्या सह शीख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यामध्ये यावेळी रॅली काढून मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. खादगाव ते मनमाड कृषि उत्पन्न बाजार समितीपर्यंत रॅली आल्यानंतर येथे एक सभा घेण्यात आली. यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी नवीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. यावेळी किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस देविदास भोपळे, साधना गायकवाड यांच्यासह किसान सभेचे पदाधिकारी व शीख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- “तो भारतीय फलंदाजीचा एक मजबूत स्तंभ आहे”, पुजाराच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया
- ‘स्मशानभूमीच्या समस्या दूर करा’, निलेगाव ग्रामस्थ रस्त्यावर !
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणेचे भावनिक भाषण, व्हिडिओ व्हायरल
- ‘ममतांना ‘जय श्रीराम’ घोषणा देणे म्हणजे; वळूला लाल कपडा दाखवण्यासारखे’
- ऑस्ट्रेलियामधील ऐतिहासिक विजयावर आनंद महिंद्रा खूश; या खेळाडूंना मिळणार SUV
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
