मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयावर उद्योगपती आनंद महिंद्रा जाम खूश झाले आहेत. त्यांनी भारतीय टीममधील सहा तरुण खेळाडूंना महिंद्रा थार SUV देण्याची घोषणा केली आहे.
‘या’ खेळाडूंना मिळणार SUV?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शुभमन गिल मोहम्मद सिराज, टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी यांना SUV मिळणार आहे. त्याचबरोबर ब्रिस्बेनमध्ये दुसरीच टेस्ट खेळणाऱ्या शार्दुल ठाकूरलाही SUV देण्याचं महिंद्रा यांनी जाहीर केलं आहे. ब्रिस्बेन टेस्टमध्ये या सर्वांनीच चांगलं प्रदर्शन केलं होतं. वॉशिंग्टन सुंदरनं पहिल्याच टेस्टमध्ये 62 आणि 22 रन्सची उपयुक्त इनिंग खेळली होती. त्याचबरोबर चार विकेट्स घेतल्या होत्या. 328 रनचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय टीमला शुभमन गिलनं चांगली सुरुवात करुन दिली होती. गिलनं 148 बॉलमध्ये 91 रन काढत विजयाचा पाया रचला होता.
शार्दुल ठाकूरने 67 रन्सची खेळी केली तसंच सात विकेट्स घेतल्या. पहिली टेस्ट खेळणाऱ्या टी. नटराजननं पहिल्या डावात तीन विकेट्स घेतल्या होत्या. नवदीप सैनीला एकही विकेट मिळवण्यात यश मिळालं नाही. मात्र दुखापतग्रस्त असूनही त्यानं पाच ओव्हर बॉलिंग केली. त्याचबरोबर ऋषभ पंतनं विजयी चौकार मारला तेंव्हा तो दुसऱ्या बाजूनं पंतला साथ देत होता.
आनंद महिद्रांनी खेळाडूंचा सन्मान करण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांनी यापूर्वी 2017 साली सुपर सीरिज जिंकणाऱ्या किदांबी श्रीकांतला एक TUV300 भेट दिली होती. महिंद्रा यांच्या या निर्णयामुळे मोहम्मद सिराजचा आनंद दुप्पट झाला आहे. त्यानं नुकतीच एक BMW कार घेतली आहे. सिराज ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सर्वात यशस्वी बॉलर असून त्यानं 3 टेस्टमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचे अनावरण करताना उद्धव ठाकरे भावूक, म्हणाले…
- जयंत पाटील सलग १८ दिवस दौऱ्यावर; ३ हजार किलोमीटरचा प्रवास करत घेणार आढावा
- अजूनही हार्दिक दुःखातून सावरला नाही; वडिलांच्या आठवणीत झाला भावूक
- वनडे, टी-२० संघात पंतला ‘या’ फलंदाजाच्या जागी संधी मिळाली पाहिजे
- प्रकृती आणखी ढासळल्याने लालूंना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

