Share

दिल्लीतील शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ ‘वंचित’चे औरंगाबादेत किसान बाग आंदोलन

Published On: 

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दिल्लीतील शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ किसान बाग आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्ली येथे पंजाब-हरियाणा येथील शेतकऱ्यांचे 50 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे.

औरंगाबाद शहरातही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून कृषी कायद्यांचा निषेध करण्यात आला. याबरोबरच केंद्राने 370चे संशोधन, सीएए \ एनआरसीसारख्या काळ्या कायद्यांबाबत मुस्लिम समाजावर होणारा अन्याय करावा, अशी मागणी केली. यावेळी दिल्ली येथे सुरू असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यात आला.

यावेळी मुस्लिम बांधवांबरोबरच विविध समाजातील महिला-पुरुषांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. भारतामधील मुस्लिम समाजावर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून खूप मोठ्या प्रमाणात विविध माध्यमांतून अन्याय होत आहे. यावेळी डॉ. जमिल देशमुख, प्रा. अब्दुल समद, खालेद पटेल, अफसर पठाण, हादी अहमद कादरी, शेख, जाकेर, सलीम पटेल, बाबा पटेल, सय्यद मुक्तार, अकबर शेख, नबाव शहा, रईस सौदागर, सुभान शंकरपुरे, जावेद देशमुख, इरफान इलाही खान, झुबेर देशमुख, इम्रान हारुण पटेल, शेख आसिफ जुम्मा खान, फिरोज खान यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!