Share

तो नुकताच ऑस्ट्रेलियाहुन आला होता, घरी न सांगताच ट्रॅक्टर रॅलीमध्ये गेला आणि घरी मृतदेहच आला…

Published On: 

दिल्ली : प्रजासत्ताक दिनी अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले असताना शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटकांनी राजधानी दिल्लीमध्ये धुडगूस घातला. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण लागले.देशाच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न काल झाला.

कालच्या घटनेत ८६ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून १५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकरबा चौक, गाझीपूर, सीमापुरी, नांगलोई टी पॉंइंट, टिकरी बॉर्डर आणि लाल किल्ला भागात झालेल्या ८६ पोलीस कर्मचारी जखमी झाले अहेत.  गाजीपूर, सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचे बॅरीकेड्सही तोडले.

या आंदोलना दरम्यान आयटीओ कार्यालयाजवळ एका आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आंदोलनात सहभागी झालेला व्यक्ती ट्रॅक्टर चालवत होता. सदर आंदोलकाने वेगाने ट्रॅक्टर आणत रस्त्यावर उभ्या पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड वर याने जोरदार धडक दिल्यामुळे ट्रॅक्टर पलटी झाला.

नवरीत सिंह हा आंदोलक ट्रॅक्टर चालवत होता. ट्रॅक्टर पलटी झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. मात्र, इतर शेतकऱ्यांनी नवरीतचा मृत्यू हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे झाल्याचा दावा केला होता. या शेतकऱ्यांनी नवरीतचा मृतदेह तिरंग्यामध्ये गुंडाळून आयटीओ क्रॉसिंगजवळ ठेवला होता. आता नवरीत सिंह याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याच्या मृत्यूचं कारण उघड झालं आहे.

या रिपोर्टनुसार, गोळी लागून नाही तर डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे नवरीतचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टमनंतर नवरीतचा मृतदेह नवरीतच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आला आहे. दरम्यान, त्याच्या मृत्यूमुळे घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केवळ तीन दिवसांपूर्वी २७ वर्षीय नवरीत सिंह ऑस्ट्रेलियातुन मायदेशात परतला होता. नवरीत सिंह हा दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होणार आहे, हे कुटुंबियांना देखील ठाऊक नव्हते. नातेवाईकाकडे जात असल्याचं सांगून तो घरातून निघाला होता. परंतु, मृत्यूपूर्वी त्याच्याशी फोनवर संवाद झाला तेव्हा त्यानं आपण शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याचं सांगितलं, असं वडील साहब सिंह यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात महाराष्ट्र टाइम्सने वृत्त दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!