टीम महाराष्ट्र देशा- भारतीय जनता पक्षातून निलंबित करण्यात आलेले खासदार कीर्ती आझाद यांनी भाजपला राम-राम ठोकत अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
आझाद यांनी सोमवारी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. पक्षविरोधी वक्तव्यांमुळे भाजपने त्यांची 2015 मध्ये पक्षातून हकालपट्टी केली होती.