Share

किरीट सोमय्यांच्या ‘त्या’ वक्तव्याला, संजय राऊतांचा अप्रत्यक्ष टोला; म्हणाले…

Published On: 

पुणे : १०० कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अखेर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक करण्यात आले आहे. १३ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. याला अनुसरून भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत अनिल देशमुख नंतर अनिल परब असे वक्तव्य केले होते. परंतु विरोधकांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.

यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधत असतांना राऊत म्हणाले की,’माझ्या भाषेत बोलायचे झाले तर चुXX आहेत ते लोकं. चुXX … असा शब्द बाळासाहेबांनीही अनेकदा वापरला आहे. चुXXचा अर्थ मूर्ख असा आहे. तुम्ही कोण आहात? याला त्याला अटक करायला तुमच्या बापाची केंद्रीय तपास यंत्रणा आहे का?तुम्ही स्वत:ला सांभाळा. तुम्हाला कधी अटक होईल या तारखा आम्हालाही माहीत आहे. पण आम्ही या पातळीवर उतरायचे का? असा संतप्त सवाल राऊतांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’अनिल देशमुख स्वत:हून ईडीसमोर हजर झाले आहेत. आता ईडीची जबाबदारी आहे. जे तक्रारदार आहेत त्यांना ईडीने समोर आणावं. विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी असे बरेच लोक पळून गेले आहेत. त्यांना आणले का? हे सर्व लोक पळून जाण्यास केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्राच्या मदतीशिवाय ते पळून जाऊच शकत नाहीत,’असा दावाही त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!