नवी दिल्ली : सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं आहे. यासंदर्भात पोलिसांना त्यांनी लेखी लिहून दिलं आहे.
यासोबतच रेणू शर्मांच्या वकिलांनी देखील केस सोडल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही काळापासून तिची बहिण आणि मुंडे यांच्यात सलोख्याचे संबंध नव्हते. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली होती, असं रेणू शर्माने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यानंतर राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.
यातच, भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपत्ती आणि धनंजय मुंडे संतती लपवतात,’ असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. तसेच, ‘ तक्रार करणाऱ्या महिलेवर ठाकरे आणि पवार यांनी दबाव टाकला. महाराष्ट्रात ठाकरे आणि पवारांचा येवढा दबाव आहे की, कोणाही विरोधात बोलू शकत नाही. माझाही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता,’ असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे. ‘महिलेने तक्रार मागे घेतली असली, तरीही दूसऱ्या विवाहाची माहिती धनंजय मुंडेंनी लपवली आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक आयोगाला यांचं स्पष्टीकरण द्यावच लागेल,’ असं किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा प्रदेश महिला मोर्चातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात आले होते. पण धनंजय मुंडेविरोधातील तक्रार मागे घेतल्याने त्यांना दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘बहुजन समाजातून आलेल्या धनंजय मुंडेंना भयंकर त्रास झाला, त्याला वाली कोण ?’
- आरटीई प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहिर
- ‘चलो बुलावा आया है’ प्रसिद्ध भजन गाणारे भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचं निधन
- काँग्रेस स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार : नाना पटोले
- पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : चारचाकीतून प्रवास करताना आता मास्कची गरज नाही ! मात्र…


