मुंबई: भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या सध्या महावीकस आघाडी सरकारचे घोटाळे बाहेर काढण्यात व्यस्त झाले आहेत. महावीकस आघाडी सरकारमधील अनेक नेते त्यांच्या रडारवर असल्याचे देखील त्यांनी अनेकवेळा सांगितले आहे. या सगळ्यांचे घोटाळे उघडे करत ते महाराष्ट्रभर दौरे देखील करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच ते अमरावती इथे झालेल्या हिंसचारा संदर्भात अमरावती दौरा करणार होते मात्र संचारबंदी लागू असल्याने आणि पोलिसांच्या विनंतीवरून त्यांनी तो दौरा पुढे ढकलला आहे. मात्र आता ते उद्या औरंगाबादला जाणार असल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी त्यांच्या ट्विटरवरुन माहिती दिली आहे की उद्या म्हणजेच दिनांक १९ नोव्हेंबर रोजी ते औरंगाबाद येथे जाणार आहेत. ‘ठाकरे सरकारचे घोटाळे’ या संदर्भात ते औरंगाबाद येथे जाणार आहेत. ठाकरे सरकारने काय काय घोटाळे केले आहेत त्याच सोबत महावीकस आघाडी सरकार कसं भ्रष्ट सरकार आहे, अशा अनेक विषयांवर ते बोलणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Tomorrow 19 Nov I will visit Aurangabad ( Sambhaji Nagar) in connection with
"Thackeray Sarkar ke Ghotale"
उद्या १९ नोव्हेंबर मी
"ठाकरे सरकारचे घोटाळे" संबंधात
औरंगाबादचा ( संभाजी नगर) दौरा करणार आहे@BJP4India @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 18, 2021
भाजप नेते हे भ्रष्टाचार आणि घोटाळे उघडकीस आणण्यासाठी प्रामुख्याने ओळखले जातात. गेल्या काही दिवसांपासून सतत ते चर्चेत राहत आहेत. त्याचं कारणही तसच आहे, महावीकस आघाडी सरकार निवडून आल्यानंतर त्यांनी महावीकस आघाडी सरकारमधील अनेक मोठ्या नेत्यांना गोत्यात आणले आहे. अनेकांच्या मागे ईडीच्या चौकश्या देखील लावल्या आहेत. अमरावती येथे हिंसाचार झाला त्या पार्श्वभूमीवर ते अमरावती दौरा करणार होते मात्र आमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेतला होता त्याचह सोबत अमरावती पोलिस आयुक्तांनी संचारबंदी लागू असल्याने हा दौरा रद्द करावा अशी विनंती देखील केली होती.
महत्वाच्या बातम्या:
- ‘न्यूझीलंडच्या ‘या’ गोलंदाजाला माझी कमजोरी माहीत आहे’; रोहित शर्माचा खुलासा
- ‘अनिल देशमुख प्रकरणी राज्य सरकारची भूमिका संशयास्पद
- ‘शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्रिपद द्या, पण युतीचं सरकार स्थापन करा’
- रोहित-राहुलच्या ‘पदार्पणात’ टीम इंडियाचा मोठा विक्रम; T20 विश्वचषक चॅम्पियन ऑस्ट्रेलियालाही टाकले मागे
- ‘तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांवर अॅक्शन घ्याल त्याला रिअॅक्शन मिळाल्यास आम्हाला दोष देऊ नका’


