औरंगाबाद : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देण्यासाठी कोल्हापूरला येत असलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या कराडमधून परतले आणि कोल्हापुरात होणारा संभाव्य संघर्ष तात्पुरता टळला असल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी पक्षाने त्यांना कोल्हापुरी हिसका दाखविण्याचा दिलेला इशारा आणि स्वागताला भाजपने केलेली तयारी यामुळे कार्यकर्ते एकमेकांना भिडण्याची चिन्हे होती.
यामुळेच रेल्वे स्थानकासह ठिकठिकाणी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमय्या माघारी फिरले आणि पोलिसांनी नि:श्वास टाकला. पण या निमित्ताने संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या एका हाय होल्टेज ड्रामावर तात्पुरता पडदा पडला. दरम्यान या सर्व प्रकरणावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भाष्य केले आहे.
‘केंद्रीय यंत्रणा चलन फाडणाऱ्या पोलिसांसारखे वाटत आहेत. किरीट सोमय्या हे सीबीआयचे प्रमुख आहेत का, की ईडीचे डायरेक्टर आहेत का?’ असा खोचक टोला सुळे यांनी यावेळी बोलताना लगावला आहे. तसेच केंद्रीय यंत्रणा चलन फाडणाऱ्या पोलिसांसारखे वाटत आहेत. यांच्यातून काही निघणार नाही, मात्र आम्ही लढत राहणार आहोत. सत्य कधी पराजित होत नाही, असे देखील सुप्रिया सुळे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- चिपी विमानतळ सुरू करण्यास DGCA ची परवानगी; पुन्हा श्रेयवाद रंगणार ?
- ‘अहो पाटील, अजितदादांनी तुमच्यासह १०५ आमदार गुंडाळून मागच्या खिशात ठेवले आहेत’
- माणसांमधली आपुलकीची भावना कायम राहावी; एवढेच बाप्पा चरणी मागणे – विद्या गावंडे
- महाराष्ट्र पुन्हा हादरला : नराधमांचा हैदोस, सामूहिक बलात्कार पीडितेचा दुर्दैवी मृत्यू
- ‘माझी लढाई एक प्रकारे क्रांतीच, आता शांत बसणार नाही’, सोमय्यांचा मुंबईत एल्गार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

