मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोन दिग्गज नेत्यांमधील वाद आणि यावरून सुरु असलेले राजकारण उभा महाराष्ट्र कालपासून पाहत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना ते म्हणाले कि, ‘देवेंद्र फडणवीस हे असे दबंग नेते आहेत कि असले १०० अजित पवार खिशामध्ये घेवून फिरतात. ते उद्धव ठाकरेंसारखे नाहीत कि सरकारमध्ये काय चालले आहे आणि नाही हेच ठावूक नाही. देवेंद्र फडणवीस हे असामान्य नेते आहेत, शिवसेनेने भयंकर त्रास देवून देखील ते ५ वर्षे मुख्यमंत्री राहिले, हि सोप्पी गोष्ट नव्हती.’ असे मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
दरम्यान आता यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते व आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना चांगलेच सुनावले आहे. यावर बोलताना ते म्हणाले कि, ‘अहो पाटील अख्या भारताला तसेच पंतप्रधान मोदी व अमित शाह यांना माहित आहे कि अजित दादा काय आहेत. तुम्ही काय खिशात १०० अजित पवार घेवून फिरण्याची भाषा करताय, तुमचे १०५ आमदार तुमच्या सहित मागच्या खिशात अजित दादांनी त्याच दिवशी गुंडाळले ज्या दिवशी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट उठवली.
राहीला प्रश्न तुमचा तर तुम्ही सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ शोधत एका प्रामाणिक महिलेचा राजकीय बळी घेतला आहे. काल कोल्हापुरी चप्पल दाखवल्यावर आज तुम्हाला पळावे लागले. आता तुम्हाला पुण्यातील मिसळपाव खाण्याची इच्छा असेल तर अजित दादांच्या नादाला तुम्ही आणि फडणवीसांनी लागू नये. तेव्हा पाटील तुम्ही नाद कोणाचा पण करा पण अजित दादांचा करू नका.’ असा घणाघात अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांवर केला आहे.
Video | Amol Mitkari | चंद्रकांत पाटील, नाद सर्वांचा करा पण अजितदादांचा करु नका; अमोल मिटकरी यांचा इशारा @amolmitkari22 @ChDadaPatil #AmolMitkari #ChandrakantPatil #AjitPawar #BJP #NCP
अन्य बातम्या, व्हिडीओ पाहा – https://t.co/BV9be230nv pic.twitter.com/hqUmK6HOtv
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 20, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र पुन्हा हादरला : नराधमांचा हैदोस, सामूहिक बलात्कार पीडितेचा दुर्दैवी मृत्यू
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- तमाशा ही लोककला, परंतु बाजारू लोकांना ती कशी कळणार; सदाभाऊ मिटकरींवर भडकले
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- मुनगंटीवार म्हणाले, बाळासाहेबांचा फोटो काढला तर शिवसेनेची किंमत…; शिवसेनेनं दिलं ‘हे’ प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

