Share

‘माझी लढाई एक प्रकारे क्रांतीच, आता शांत बसणार नाही’, सोमय्यांचा मुंबईत एल्गार

Published On: 

मुंबई : मी लढत असलेली एक प्रकारची क्रांती आहे. मी आता शांत बसणार नाही. माझी लढाई घोटाळेबाजांविरोधात आहे. मी यांचे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे सरकारची दादागिरी सुरु आहे. पण ही दादागिरी जास्त दिवस चालणार नाही. पवार आणि ठाकरेंचे मुश्रीफांना वाचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण मी आता थांबणार नाही. भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करावीच लागणार, असे वक्तव्य भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे.

सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोन दिग्गज नेत्यांमधील वाद आणि यावरून सुरु असलेले राजकारण उभा महाराष्ट्र पाहत आहे. कोल्हापूर येथे जात असताना सोमय्या यांना कराड पोलिसांनी आज मंगळवारी पहाटे ओगलेवाडी येथील रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी कराड येथेच पत्रकार परिषद घेतली. सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यास मनाई केल्यानंतर ते मुंबईत परतले आहेत.

मुंबईत परतताच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलत सोमय्या यांचा जयजयकार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ‘किरीटजी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं…’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणादून सोडला होता. यावेळी सोमय्या यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना ठाकरे सरकार, मुंबई महानगरपालिकेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. यावेळी राज्य मंत्रिमंडळाचा ‘४० चोर मंत्रिमंडळ असा उल्लेख करत आता गंभीर लढाईला सुरुवात झाली असून आम्ही आता या महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार, असा इशारा त्यांनी दिला.

‘ठाकरे सरकार हे भ्रष्टाचारी असून राज्यातील लोकांना भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. लोकांच्या या विश्वासाला आम्हाला जागायचे आहे. तेव्हा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे अलीबाबा ४० चोर मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारमुक्त भारत बनवला, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचारयुक्त बनवला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!