मुंबई : सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लाटल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना चौकशीला हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नोटिसीद्वारे आदेश देण्यात आले होते.
परंतु किरीट सोमय्या हे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दिल्लीला गेले अशी माहिती त्यांच्या वकीलांनी दिली. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘किरीट सोमय्या मुलासह फरार झाले आहेत. न्याय यंत्रणेवर दबाव आणुन सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत. असा प्रश्नही केला होता.
तसेच, ‘सोमय्या बाप बेटे फरार है. ये दोनो मिल्खा सिंग से तेज भाग रहे हैं. Ok. भाग सोमय्या भाग’, अशी टीकाच संजय राऊत यांनी केली होती. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार किरीट सोमय्या गुजरातमध्ये आहेत, ते गुजरातमध्ये असल्याची माहिती एका वृत्तवाहिनेला विश्वसनीय सूत्राने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या रस्त्यांवर ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा!
यशोमती ठाकूर यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांची टीका; म्हणाले, “उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर…”
“शरद पवारांना युपीएचं अध्यक्ष करावं म्हणजे…”, यशोमती ठाकूर यांच्या ‘त्या’ वक्तव्याला शिवसेनेचे प्रत्युत्तर
“सोमय्यांच्या देशविरोधी कृत्यात भागीदार होऊ नका, अन्यथा राजभवनाची इभ्रत जाईल”; संजय राऊत
“आज शरद पवार मुख्यमंत्री असते तर…”, यशोमती ठाकूर यांचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

