🕒 1 min read
पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी करायला आज राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील शहरात आले होते. आगामी महानगरपालिकेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेची सत्ता पुन्हा हस्तगत करेल असा विश्वास जयंत पाटील यांनी बोलून दाखवला.
शहरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असतानाच जयंत पाटील यांनी किरीट सोमय्या यांच्यावर पण टीका केली आहे. प्रसिद्धी आणि लक्ष वेधून घेण्यासाठीच महाराष्ट्रातील मोठ्या मोठ्या व्यक्तींवर आरोप करायची किरीट सोमय्या यांना सवय असल्याचा टोला महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील(jayant Patil) यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांना लगावला आहे.
नवाब मलिक यांना अटक झाल्यावर किरीट सोमय्या यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे . उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्धी आणि लक्ष वेधून घेण्यासाठी किरीट सोमय्या मोठ्या मोठ्या व्यक्तींवर आरोप करत आहेत अशी टीका आज जयंत पाटील यांनी केली.
महत्वाच्या बातम्या :
- महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांना जोडणार सेमी हायस्पीड रेल्वे
- IND vs SL: भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी २० सामना आज रंगणार
- ‘माझा लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी आहे’ – संभाजीराजे भोसले
- Saba Azad साठी Hrithik Roshan ची पहिली पोस्ट, नात्यावर शिक्कामोर्तब?
- ‘महाविकास आघाडी दाऊदचे समर्थन करत आहे’ – चंद्रकांत पाटील


