🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच गृहखात्याने पोलिसांना सूचना करून बेकायदेशीर कारवाई केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. भाजपच्या इतर नेत्यांनी देखील कालसह आजच्या घडामोडींवरून महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. आता महाविकास आघाडीतील नेते देखील भाजपला चोख प्रत्युत्तर देत आहेत.
शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी किरीट सोमय्या यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘किरीट सोमय्या यांना सतत प्रसिद्धी झोतात राहायला आवडतं. हा त्यांचा जुना छंद आहे. काल पोलिसांचा आदेश असताना त्यांनी उगाच अशी स्टंटबाजी केली आणि जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांचे नाव त्यांनी घेतलं. त्याचं कालचं व्यक्त अशोभनीय आहे. पण त्यांना हि सवय आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी देखील याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. याबाबत काही त्यांना आक्षेप असेल तर कायदेशीर तक्रार करावी,’ असं मनीषा कायंदे म्हणाल्या आहेत.
माननीय गृहमंत्र्यांनी आपल्या पत्रकार परिषदमध्ये स्पष्ट केले आहे की, @KiritSomaiya यांना कुठल्याही प्रकारे अटक केलेली नाही! तरीही हे महाशय सतत खोटे बोलत आहेत! मीडियाची मदत घेऊन खोटे आरोप करून प्रसिद्धीत राहण्याचा एकमेव उद्योग ते करीत आहेत ! @BJP4India @BJP4Maharashtra pic.twitter.com/cwi5ydgsGr
— Dr.Manisha Kayande (@KayandeDr) September 20, 2021
गृहमंत्री वळसे-पाटील काय म्हणाले ?
‘किरीट सोमय्या यांच्यावरील कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही. स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीवरुन किरीट सोमय्या यांना नोटीस बजावण्यात आली होती,’ अशी माहिती वळसे-पाटील यांनी दिली आहे.
‘साधारणतः अशी घटना होते, त्यावेळी वरिष्ठ अधिकारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना माहिती देतात. पण याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली की, नाही. मला माहीत नाही. पण यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाचा संबध नाही, याबात जो काही निर्णय घेतला, तो गृहमंत्रालयानं घेतला. ही वस्तूस्थिती आहे,’ असं दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कृषी अधिकारी उपस्थित नसतील तर पंचनामे करू देऊ नका, आ. राजेश पवार यांचे आवाहन
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- ‘बाळासाहेबांचा फोटो काढला तर शिवसेनेची किंमत शून्यापेक्षाही कमी’, मुनगंटीवार यांची टीका
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
