🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचा खरा चेहरा स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. जर त्यांचा फोटो कमी केला तर शिवसेनेची किंमत शून्यापेक्षाही कमी होते असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. २०१९ च्या विधानसभेच्या निकालानंतर शिवसेनेने बेईमानी केली असा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक करत शिवसेनेवर निशाणा साधला.
ते म्हणाले, शिवसेनेचा खरा चेहरा बाळासाहेब ठाकरेंचा आहे. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कमी केला तर शिवसेनेची किंमत शून्यापेक्षाही कमी होईल. भाजपने युती तोडली असं म्हणणं म्हणजे ते जगातील आठवे आश्चर्य ठरेल. ज्यादिवशी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. भाजपाचे १०५ आमदार आले तेव्हा असे वाटलं की आता भाजपा कुणाच्याही मदतीशिवाय सरकार स्थापन कठीण आहे. तेव्हाच निकालाच्या दिवशीच पत्रकार परिषद घेत शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची भूमिका सांगितली.’
स्व.बाळासाहेब ठाकरेंचा फोटो जरी कमी केला तरी, शिवसेनेची किंमत शून्यापेक्षा कमी आहे..! @BJP4Maharashtra @MiLOKMAT @abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi pic.twitter.com/NHx9XCVQ7i
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) September 19, 2021
‘शिवसेनेने युतीसाठी कधी प्रयत्न केला नाही. शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला. बेईमानीचं आयुष्य फारकाळ टिकत नाही. २०२४ ला अथवा जेव्हा कधीही महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरं जाईल तेव्हा जनता मविआ नेत्यांची लक्तरे फाडल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील वक्तव्यावर शरद पवार हे नाराज असल्याची चर्चा होती. यावर मुनगंटीवार म्हणाले की, ‘शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त करण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यांच्यावरच जनता नाराज आहे, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्हाला जनतेने निवडणुकीत नापास करून टाकलेले आहे. मात्र, असे झाल्यानंतरही तुम्ही दुसऱ्याच्या उत्तरपत्रिकेवरील नाव खोडून स्वत:चे नाव टाकले आणि सत्ता आली, सत्ता आली असे सांगत आहात. आता जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा जनता तुमच्यावर नाराजी व्यक्त करेल, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोमय्यांच्या रडावर आता ठाकरे कुटुंबीय; अलिबागला जाऊन रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- ‘सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच’, हसन मुश्रीफांचा आरोप
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
