Share

कृषी अधिकारी उपस्थित नसतील तर पंचनामे करू देऊ नका, आ. राजेश पवार यांचे आवाहन

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : आपल्या मतदार संघातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाई साठी सुरू असलेल्या विमा कंपनीच्या पंचनाम्यादरम्यान, कृषी अधिकारीही उपस्थित असावेत असे निवेदन आमदार राजेश पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. तरी अजूनही बऱ्याच ठिकाणी कृषी अधिकारी उपस्थित नसून विमा कंपनीचे प्रतिनिधी एकट्यानेच पंचनामे करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी उपस्थित नसतील तर पंचानामे करु देऊ नका असे आवाहन आमदार पवार यांनी केले आहे.

मागील काही दिवसात जिल्हा आणि परिसरामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचानामे करुन तात्काळ मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, विमा कंपनीचे अधिकारी पंचनामे करण्यासाठी पोहोचत नसून योग्य पंचनामे होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. त्यामुळे जो पर्यंत कृषी अधिकारी सोबत घेत नाहीत, तो पर्यंत पंचनामे करु नये अशी मागणी आमदार पवार यांनी केली होती.

त्यामुळे शेतकऱ्यांनीच आता कृषी अधिकारी असेल तरच पंनमाने करु द्यावी, अशी भूमीका घ्यावी असे आवाहन आमदार पवार यांनी केले आहे. इतकेच नाही तर हा प्रकार कोणत्याही शेतकऱ्यास आढळून आल्यास त्वरित आपल्याशी, जिल्हाधिकाऱ्यांशी किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधावा असे आवाहन देखील आमदार राजेश पवार यांनी शेतकरी बांधवाना केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!