Share

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला- किरीट सोमय्या

Published On: 

अमरावती : त्रिपुरातील कथित घटनेवरुन 12 नोव्हेंबर रोजी अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये मोठा हिंसाचार (Violence) पाहायला मिळाला होता. त्यानंतर 13 नोव्हेंबर रोजी भाजपकडून पुकारण्यात आलेल्या अमरावती बंदवेळीही तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर अमरावती पोलिसांकडून (Amravati Police) भाजप नेत्यांसह अनेकांवर कारवाई करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणावरुन भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी विश्वासघात केल्याचा घणाघात सोमय्या यांनी केला आहे. शनी मंदिराचं दर्शन घेतलं, मारुतीचं दर्शन घेतलं. इथले पुजारी, महिला भाविकांशी बोललो. त्यावेळी तेथील महिलांनी जे वर्णन केलं ते ऐकून भीती वाटते. दंगलखोरांनी महिलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जर बाळासाहेब असते तर या दंगेखोरांनी असं केलं नसतं. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला. 1993 मध्ये बाळासाहेब महिलांना वाचवण्यासाठी स्वत: पुढे आले होते, अशा शब्दात सोमय्या यांनी उद्धव ठारकेंवर निशाणा साधला आहे.

13 नोव्हेंबरच्या हिंसाचाराचा हिशेब मागता. 12 नोव्हेंबरचा हिशेब कोण देणार? 12 तारखेच्या हिंसाचाराला पोलिसांनी परवानगी दिली होती का? मंदिरात पूजा करणाऱ्या पूजाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न झाला. आज बाळासाहेब नाहीत, पण तेव्हा आम्ही हिंदूंना वाचवण्यासाठी एकत्र होतो. यापुढे हिंदूंवर हल्ला झाला तर त्याची जबाबदारी ठाकरे सरकारची राहील, असा इशाराच यावेळी किरीट सोमय्या यांनी दिला आहे. हिंसाचाराच्या घटनेचा पाठपुरावा करण्यासाठी अमरावती दौऱ्यावर आल्याचं सोमय्या यांनी यावेळी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!