Share

विश्वास नांगरे पाटलांच्या पत्नीवर किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप; म्हणाले…

Published On: 

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये बोलत असतांना भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईचे संयुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच विश्वास पाटील यांना पोलीस दलाच्या नोकरीतून मुक्त करा, अशी मागणीही केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

यावेळी बोलत असतांना सोमय्या म्हणाले की, ‘जालना साखर कारखान्याचे दुसऱ्या भागीदार रुपाली विश्वास पाटील या आहेत. विश्वास नांगरे पाटील हे मुबंई पोलीस दलाचे संयुक्त आयुक्त आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. नांगरे पाटील यांना नोकरीतून मुक्त केलं पाहिजे.’ तसेच शरद पवार यांनी दिलेली धमकी ही अनिल देशमुख की अजित पवार यांच्यामुळे? देशमुखांवर प्रेम आहे की अजित पवार यांची काळजी आहे?, असा खोचक सवालही यावेळी सोमय्यांनी केला. ‘ठाकरे सरकारने जनतेला लुटलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे दुप्पट रुग्ण मयत झाले आहेत. तेव्हा ठाकरे सरकार हे पैसे मोजत होते. घोटाळेबाजांना शिक्षा झाली पाहिजे’, असेही ते म्हणाले.

दरम्यान, यापूर्वी सोमय्या म्हणाले होते की, ‘सध्या दिवाळी सण येतोय, दिवाळीत फटाके फोडतात. मात्र, किरीट सोमय्या दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. एक, दोन, तीन, चार किंवा पाच नाही तर पूर्ण अर्धा डझन लोकांचे फटाके फोडणार आहे. घोटाळेबाज ठाकरे-पवारांनी १२ दिवस नाटकं केली. यात ३ मंत्र्यांच्या ३ घोटाळ्यांचा आणि त्यांच्या ३ जावयांचा समावेश आहे. ठाकरे सरकारमध्ये जावयांचं राज्य आहे. अजित पवार यांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. हसन मुश्रीफांनी त्यांच्या जावयाला आणि नवाब मलिकांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. एकदम बॉम्ब फोडण्याचं काम किरीट सोमय्या करणार आहे. यांनी केवळ लवंगी फटाके फोडले.’

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!