नवी दिल्ली : भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना नेहमी अटीतटीचा होत असतो. दोन्ही संघाचे चाहते आणि खेळाडू या सामन्यासाठी उत्सुक असतात. यावर्षी २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्नच्या मैदानावर भारत-पाक पुन्हा आमनेसामने येणार आहेत. गेल्या वर्षी दुबईमध्ये झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये पाकने भारताला पराभूत केले होते. याचाच संदर्भ घेऊन पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय संघासाठी सामन्याआधीच भविष्यवाणी केली आहे.
एका प्रसिद्ध वृतवाहिनीला मुलाखत देताना शोएब म्हणाला ” मेलबर्नच्या मैदानावर आम्ही भारताला पुन्हा पराभूत करू. आमचा टी ट्वेंटी संघ भारतीय संघापेक्षा प्रबळ आहे. माध्यमे उगाच भारतावर दबाव आणतात. जेव्हा या दोन्ही संघांचा सामना होते तेव्हा भारताने सामना गमावणे सामान्य गोष्ट आहे” शोएबच्या या वक्तव्यावर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे.
२०२१ मध्ये झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानच्या संघाने भारताला पराभूत केल होत. भारताने हा सामना १० विकेट्सने गमावला होता. आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये ६ वेळा लढत झाली आहे . ज्यात भारत ५ वेळा तर पाकिस्तान एकदाच जिंकला आहे. यंदाची भारत पाक लढत अनेक कारणांनी विशेष ठरणार आहे . यावेळी रोहित शर्मा पहिल्यांदाच कर्णधार म्हणून पाकिस्तान विरुद्ध मैदानावर उतरेल. तसेच भारत आणि पाक एकाच ग्रुपमध्ये आहेत. त्यामुळे भारतीय संघ त्यांचा विजयाचा इतिहास पुन्हा कायम करण्यासाठी सज्ज दिसेल, तर पाकचा संघ पुन्हा विजय मिळवण्याच्या तयारीत असेल.
महत्वाच्या बातम्या
- तीन वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर संत एकनाथ रंगमंदिर उद्घाटनासाठी सज्ज..!
- ‘तुम्ही जे आरोप केले त्याचे पुरावे द्या’; सोलापूर जिल्हा परिषदेचे डिसले यांना पत्र
- ही तर सुरुवात आहे, भविष्यात प्रदीप कंद यांची कामगिरी आणखी चांगली असेल-चंद्रकांत पाटील
- आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिल्या पाच शहरांमध्ये औरंगाबाद; शिवसेनेचे योगदान विचारणाऱ्यांनी हे वाचाच-अंबादास दानवे
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अल्लू अर्जून नव्हे तर ‘या’ अभिनेत्याचे मानधन सर्वात जास्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

