सोलापूर: ग्लोबल टीचर अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित रणजितसिंह डिसले आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांना सोलापूर जिल्हा परिषदेनं (Solapur ZP) एक पत्र पाठवण्यात आलं आहे. त्या पत्रातून जिल्हा परिषदेकडून रणजितसिंह डिसले यांनी माध्यमांशी बोलताना जे आरोप केले होते. त्या आरोपांविषयी पुरावे असतील तर ते जिल्हा परिषदेकडे द्यावे असं म्हणलं आहे.
रणजितसिंह डिसले यांच्या रजेचं प्रकरण प्रसारमाध्यमांमध्ये चांगलंच गाजलेलं होतं.रणजितसिंह डिसले यांच्या रजेचा वाद निर्माण झाल्यानंतर तो प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी डिसले यांनी जे प्रसारमाध्यमांवर बोलताना आरोप केले होते त्याची चौकशी करण्यासाठी पुरावे असतील तर द्यावेत,अशा आशयाचंच पत्र जिल्हा परिषदेच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात आलं आहे. डिसले यांनी पुरावे यांनी दिल्यास दोषींवर कारवाई करु, असं जिल्हा परिषदेच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.
रणजितसिंह डिसले यांनी जिल्हा परिषदेकडून पाठवण्यात आलेल्या पत्राविषयी माहिती दिली आहे. मला अद्याप पत्र पोहोचलेल नाही, असं ते म्हणाले आहेत. रणजितसिंह डिसले यांना पत्र मिळाल्यानंतर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण त्यांच्यावर तसेच त्यांच्या कर्तुत्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे या प्रकरणावर नक्की काय तोडगा निघतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अल्लू अर्जून नव्हे तर ‘या’ अभिनेत्याचे मानधन सर्वात जास्त
IPL 2022 : ठरलं तर…! ‘हे’ असणार लखनऊ संघाचे नाव; संजीव गोयंकांनी केली घोषणा
संजय राऊतांच्या व्यंगचित्रावर केशव उपाध्येंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “कोण चौथ्या नंबर ला…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

