औरंगाबाद:अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयी-सुविधायुक्त सज्ज असलेल्या संत एकनाथ रंगमंदिराचे मंगळवारी (दि.२५) सायंकाळी ७ वाजता औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन समारंभाच्या पूर्वतयारीची सोमवारी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय(Aastik Kumar Pandey) यांनी रंगमंदिराची पाहणी करून नियोजनबध्द कार्यक्रमाच्या दृष्टीने सूचना दिल्या.
औरंगाबाद शहरात महापालिकेचे दोन नाट्यगृह आहेत. संत एकनाथ रंग मंदिर आणि संत तुकाराम नाट्यगृह. संत एकनाथ रंग मंदिर हे अतिशय जुने नाट्यगृह आहे. जुन्या काळापासून सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळीचे केंद्र म्हणून नाट्यगृहाकडे पाहिले जाते. मात्र काही वर्षांपूर्वी याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याने नूतनीकरणासाठी ते बंद करण्यात आले होते. मात्र त्याचे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. तीन वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर रंग मंदिराचे काम आता पूर्ण झाले आहे. अखेर आज उद्घाटनाचा दिवस उगवलाच.
मात्र महानगरपालिकेने संत एकनाथ रंगमंदिराच्या खासगीकरणाचा घाट घातल्याने मनसेने याला मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे. आज पालकमंत्र्यांच्या हस्ते रंगमंदिराचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आसन व्यवस्था, रंगमंच व्यवस्था,साऊंड सिस्टीम व्यवस्था, विद्युत व्यवस्था, बाल्कनी, फायर व एक्झिट आदींची बारकाईने पाहणी केली. यात कुठल्याही प्रकारच्या त्रुटी राहता कामा नये, असे निर्देश मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले. यावेळी जीएसटी आयुक्त जी. श्रीकांत, शहर अभियंता एस. डी.पानझडे, उप संचालक नगररचना ए.बी.देशमुख आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
संजय राऊतांच्या व्यंगचित्रावर केशव उपाध्येंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “कोण चौथ्या नंबर ला…”
तुमचं लग्न कधी होणार? म्हणाऱ्या नेटकऱ्यांना सोनाक्षीने दिलं ‘हे’ उत्तर
‘…यांची मानसिक स्थिती अत्यंत खालावली आहे’; कॉंग्रेसची किरीट सोमय्यांवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

