मुंबई : बॉलीवूड किंग खानचा आज ५५ वा वाढदिवसनिमित्ताने चाहत्यांकडून हार्दिक शुभेच्छा. जरवर्षी किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शाहरुखचे चाहते मन्नत बाहेर येऊन शाहरुखला शुभेच्छा देतात जर वर्षी मन्नत बाहेर लाखो चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते.
दरम्यान ‘इस बार का प्यार थोडा दूर से यार’ असं म्हणत शाहरुखने चाहत्यांना कोविड – १९ मुळे कोणीही माझ्या वाढदिवसाला, मुंबईतील मन्नत बंगल्याबाहेर बाहेर गर्दी करू नये, असं भावनिक आवाहन केलं होत. शाहरुखने चाहत्यांना, वाढदिवसाच्या काही दिवस आधीच कोविडमुळे गर्दी न करण्याचं आवाहन केलं होत.
दरवर्षी शाहरुखच्या वाढदिवशी त्याचे चाहते त्याचा बंगला ‘मन्नत’ बाहेर येऊन त्याला शुभेच्छा देतात. या वर्षी अशी गर्दी करणं धोक्याचं आहे हीच बाब लक्षात घेता शाहरुखने आधीच ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांना आवाहन केलं होत. यावर्षी चाहत्यांनी किंग खानला सोशल माध्यमातून भ भरभरून प्रेम आणि शुभेच्छा दिल्या जात आहेत.
यावर्षी शाहरुख आणि काजल च्या DDLJ या चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाली. दरम्यान सिमरनची ही प्रेमकहाणी लंडनच्या प्रसिद्ध लिसेस्टर स्क्वेअरमध्ये फुलणार आहे. ‘DDLJ’च्या पंचविशीनिमित्त येथे शाहरुख आणि काजोलचा कांस्य पुतळा उभारण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- अंबानी कुटुंबाची ‘झेड प्लस’ सुरक्षेविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
- वैभव नाईकांचा जबरदस्त पलटवार, राणेंच्या गडाला लावला सुरुंग
- शरद पवारांनी एकनाथ खडसेंना वाचवण्याचाच प्रयत्न केला : अंजली दमानिया
- कांदा खरेदीवर लावलेले निर्बंध उठवण्याबाब मुख्यमंत्र्याचे केंद्राला पत्र; आता उत्तराची प्रतीक्षा
- ‘सगळं उघड केलं ना तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड होईल’


