सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात शिवसेना आमदार वैभव नाईक आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. कुडाळ पंचायत समितीच्या सभापती नूतन आईर यांनी 29 ऑक्टोबरला कणकवलीत नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमधे प्रवेश केला. त्यामुळे कुडाळ पंचायत समितीत आता भाजपची सत्ता आली.
आता हा प्रकार ताजा असतानाच अवघ्या तीन दिवसात वैभव नाईक यांनी वचपा काढला. कट्टर राणे समर्थक पंचायत समिती सदस्याला शिवसेनेत प्रवेश देत नाईकांनी राणेंवर पलटवार केला. कट्टर राणे समर्थक असलेल्या कुडाळ पंचायत समिती सदस्या निलिमा वालावलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वालावलकर या कुडाळ पंचायत समितीच्या पिंगुळी मतदारसंघातील विद्यमान सदस्या आहेत. त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन आमदार नितेश राणेंना वैभव नाईक यांनी धक्का दिला आहे.
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत कुडाळमधे हा पक्ष प्रवेश करण्यात आला. या प्रवेशामुळे नारायण राणेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- निवडणूक आयोग ही भाजपचीच एक शाखा ; संजय राऊत यांचा घणाघात
- देवेंद्र फडणवीस सरकारचा अजून एक निर्णय ठाकरे सरकारने बदलला
- कांदा खरेदीवर लावलेले निर्बंध उठवण्याबाब मुख्यमंत्र्याचे केंद्राला पत्र; आता उत्तराची प्रतीक्षा
- शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी साठवणूक क्षमता वाढवून द्या – मुख्यमंत्री
- जीडीपीबद्दल बोलण्याआधी जीडीपीचा फुल फॉर्म सांगा, केसरकरांचा राणेंना टोला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

