मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन लवकरच क्रिश 4 मध्ये दिसणार आहे. क्रिश लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाची तयारी वेगाने सुरू झाली आहे. चित्रपटाचे स्क्रिप्ट जवळपास पूर्ण झाले आहे. या चित्रपटासाठी राकेश रोशनही जोरदार तयारी करत आहेत.
मात्र, चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीबद्दल अजूनही चर्चा सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार कियारा अडवाणी क्रिश 4 मध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसू शकते, असे सांगितले जात आहे. निर्माते आणि राकेश रोशन यांना कियाराला चित्रपटात घेण्याची इच्छा आहे आणि तिच्याशी चर्चा देखील सुरू होती.
हृतिकला पुन्हा क्रिशच्या रुपात पाहायला मिळणार असल्याने त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत. पण आता क्रिश 4 मध्ये हृतिक रोषनसोबत नक्की कोणती अभिनेत्री झळकणार याच्या चर्चा सुरू झाल्या. कियारा अडवाणी आणि कृती सेनॉनचं नाव यामध्ये आघाडीवर होतं. अखेर राकेश रोषन यांनीच क्रिश 4च्या अभिनेत्रीची घोषणा केली आहे. कियारा अडवाणी या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : मुख्यमंत्री ठाकरेंपासून अनेक मंत्र्यांच्या संपर्कात आलेले डिसले गुरुजी कोरोनाच्या विळख्यात!
- मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम; आता एमपीएससी परीक्षा, मेगा भरतीचं काय?
- महाविकास आघाडी सरकारमुळे मराठा युवकांसमोर अंधार; चंद्रकांत पाटलांचा घणाघात
- काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून राज्य सरकार पडणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा
- मुख्यमंत्री आज पुणे-रत्नागिरी-सातारा दौऱ्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

