बीड: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. त्यामुळे बीडकरांना दिलासा मिळत आहे. कोरोना रुग्णांचा जो चढता क्रम होतं तो आता उतरत असल्याचे दिसत आहे. असे असले तरी जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूच्या नोंदी उशिराने होत असल्याने मृत्यूचा आकडा वाढू लागला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या काही प्रमाणात कमी होत असली तरी अजूनही कोरोना पूर्णपणे गेला नाही.
शनिवारी जिल्ह्यात २४ तासांतील १४ आणि जुन्या १०२ अशा एकूण ११६ मृत्यूंची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर करण्यात आली आहे, तर नवे ७८९ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच ९८१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात ५ हजार ५२० जणांची चाचणी करण्यात आली, त्यातून ७८९ नवे रुग्ण आढळले तर, ४ हजार ७३१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रुग्णांची संख्या गेल्या आठवड्यापेक्षा कमी आली आहे मात्र मृत्यू दर कायम आहे.
नव्या बाधितांत अंबाजोगाई व आष्टी तालुक्यात प्रत्येकी ६९, बीड १९५, धारूर ४७, गेवराई १०३, केज ७५, माजलगाव ४२, परळी व शिरूर तालुक्यात प्रत्येकी ५७, पाटोदा ५३ व वडवणी तालुक्यातील २२ जणांचा समावेश आहे. तसेच ९८१ जण दिवसभरात कोरोनामुक्त झाले. दरम्यान, मागील २४ तासांत १४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला, तर जुन्या परंतु पोर्टलवर अपडेट झालेल्या १०२ मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८० हजार २०२ झाली असून कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा ७२ हजार ५१० झाला आहे. आतापर्यंत १८१९ जणांचा बळी गेला असून सध्या ५ हजार ८६५ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सीईओ अजित कुंभार यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- बोनी कपुर आणि श्रीदेवीच्या अफेयरवर अर्जुन कपुरने सोडले मौन, म्हणाला…
- ‘आज बाळासाहेब असते, तर कोकणची दुर्दशा पाहून…’; भाजपचं पुन्हा एकदा टीकास्त्र
- वाढदिवशी तेजस्विनीनं केली नव्या वाटचालीची सुरुवात ; केली मोठी घोषणा
- रिक्षाचालकांना शासनाकडून दिले जाणार अर्थसहाय्य
- भोकरदन येथे रस्त्यावर फिरणारे पाच जण निघाले पॉझिटिव्ह
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

