पुणे : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वी चार दशकांचा भाजपसोबत असलेला संसार मोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांना महत्वाचं मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, सद्या फक्त राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी मिळणार यावर जवळजवळ निश्चिती असतानाच खडसेंनी भाजपला जोरदार धक्के देण्यास सुरुवात केली आहे.
उत्तर महाराष्ट्रात शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला असतानाच अजूनही काही आमदार आणि २०१९ विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपवासी झालेले नेते घरवापसी करणार असं भाकीत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते करत आहेत. अशातच, पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील एका महिला नेत्याने देखील भाजपचा राजीनामा दिला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील खडसे समर्थक असलेल्या सारिका पवार यांनी भाजपला सोडचिट्ठी दिली आहे. त्या भाजप शहर ओबीसी महिला मोर्चाच्या अध्यक्षा होत्या. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपमधून आऊटगोईंग सुरु झालं असून राज्यभरातील खडसे समर्थल भाजप सोडत आहेत.
नुकतंच भाजपचे संकटमोचक नेते मानल्या जाणाऱ्या गिरीश महाजनांना देखील खडसेंनी मोठा धक्का दिला आहे. माजी मंत्री गिरीष महाजन यांच्या बालेकिल्ल्यात खडसेंनी सुरुंग लावला आहे. जामनेरमधील तब्बल ‘दोन बस’ भरुन भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील भाजपचे दोनशेहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजप सोडून एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांनी कोरोनाला केलं चीतपट!
- अर्णब वरील कारवाई ही महाविकास आघाडीने अन्वय नाईकांना वाहिलेली श्रद्धांजली! – सचिन सावंत
- अलका ताई वयाने ज्येष्ठ आहेत, त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर होता व आजही आहे
- महाराष्ट्रातील पप्पू सरकार कोणाकोणाचा आवाज दाबणार? ; कंगणाचा घणाघात
- लोकशाहीचा आजचा काळा दिवस! गोस्वामीच्या अटकेनंतर आशिष शेलारांची बोचरी टीका


