Share

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांशी आमचा काहीच संबंध नाही; गिरीश महाजनांनी केलं स्पष्ट

Published On: 

जळगाव :  माझं आणि देवेंद्रजींचं बोलणं झालेलं आहे. राज्यपालांशी त्यांची चर्चा झालेली आहे. ही आलेली यादी बाजूला काढून ठेवण्याचं ठरलेलं असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं”, असं हसन मुश्रीफ म्हणाले होते.मुश्रीफांनी ही यादी मंजूर होणार नाही असशी शक्यता वर्तवली होती यावर माजी मंत्री आणि जामनेरचे आमदार गिरीश महाजनांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

की ‘राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसंदर्भात ठाकरे सरकारने नावे राज्यपालांकडे पाठवली आहेत, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही, निकषानुसार राज्यपाल त्यांची निवड करतील, असं महाजन यांनी दिलं आहे.

जळगावमध्ये माध्यमांशी बोलतांना महाजन पुढे म्हणाले की ‘राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना काय मिळत हा खडसे आणि राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. एकनाथ खडसे यांनी आमचा पक्ष सोडला आहे आणि आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही नगरसेवकाने, जिल्हा परिषद सदस्याने राजीनामा दिलेला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. केळी पीक नुकसानभरपाईकरिता लावलेले निकष आणि येणारे संभाव्य धोके यांच्यापासून शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही. ते त्वरित बदलावे, अशी मागणीही महाजन यांनी केली आहे.

तत्पूर्वी राज्यपाल नियुक्त आमदारांची सरकारकडून येणारी नावं बाजूला ठेवली जाणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. यावर महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!