Share

‘मद्यपी चालकाने माझ्या तेजस दादाच्या गाडीला धडक मारावी का ? चंद्रपूरच्या चिमुरडीचे मुख्यमंत्र्यांना पत्र’

Published On: 

चंद्रपूर : सध्या विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या 3 जिल्ह्यांमध्ये दारुमुक्तीच्या लढ्याला व्यापक रुप आलं आहे. काही राजकीय नेत्यांनी या जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्यासाठी प्रयत्न सुरु केल्यानंतर येथील स्थानिक आदिवासी नागरिकांनी याविरोधात लढा पुकारला आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपूरमधील एका 8वीच्या मुलीने दारुबंदीच्या मुद्द्यावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे. यात तिने ‘माझे बाबा झिंगू घरात यावेत हे आदित्य दादांना रुचेल का?’ असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. तसेच या जिल्ह्यांमधील दारुबंदी न उठवता आहे ती दारुबंदीच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

या 8 वीच्या मुलीने आपल्या पत्रात म्हटलं आहे, ‘माझे बाबा झिंगून घरात यावेत हे आदित्य दादांना रुचेल का? मद्यपी वाहनचालकाने निरपराध जनतेला चिरडून जावे किंवा माझ्या तेजस दादाच्या गाडीला धडक मारावी या विचारानेही अंग शहारते. आपण सर्व राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वंशज आहोत आणि माँ जगदंबेची ओटी जनतेची कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या करातून आम्ही कशी काय भरणार?’

‘माझे बांधव, माता भगिनी आनंदाने सुखाने नांदोत अशी मागणी आपणच आपले सर्वांचे दैवत पंढरीच्या विठोबांकडे करतो. मग दारुबंदी उठवावी हा आपल्या मंत्री महोदयांचा अनाठायी आग्रह का असावा?’ असा सवालही या आदिवासी मुलीने केला आहे.

latter 1

latter 2

latter 3

‘आदिवासींनी अनवाणी पायांनी मुंबईला जाऊन दारुबंदी केलीय’

या आदिवासी विद्यार्थीनीने म्हटलं, ‘1963 मध्ये गडचिरोलीतील गावागावांमध्ये आदिवासी नागरिकांनी आपल्या परंपरेनुसार अनवाणी पायांनी मुंबईला जाऊन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी शरद पवारांना दारुबंदीसाठी 6 वर्षे सुरु असलेल्या आंदोलनांची माहिती दिली आणि आपल्या भावना पोहचवल्या होत्या.’

‘आम्ही मुलांच्या चुका झाल्यास बाबा कान पिरगाळतात. शासनाने कायदे करणे आणि स्वनियंत्रण करणे या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कितीही समाजप्रबोधन केले तरीही कित्येक मद्यपी वाट चुकतात. अशांना समुपदेशनासह प्रसंगी कायद्याने योग्य वाट दाखविणे हे आम्हा सर्वांचे कर्तव्यच आहे असे मी मानते,’ असंही या मुलीने आपल्या पत्रात नमूद केलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!