मथुरा: उत्तर प्रदेशातल्या मथुरा येथील नंदगावमधल्या सुप्रसिद्ध मंदिरात नमाज पठण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन जण नमाज पठण करत असल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मथुरा येथे नंदगाव परिसरात नंदबाबा नावाचं सुप्रसिद्ध मंदिर आहे. त्या मंदिरातच हा सगळा प्रकार झाला असल्याची माहिती मिळते आहे.‘झी सलाम’ या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली येथील खिदमतगार या संस्थेचे सदस्य असलेले फैसल खान आणि मोहम्मद चांद हे दोघेजण निलेश गुप्ता आणि आलोक रत्न या दोघांसमवेत नंदबाबा मंदिरात पोहोचले. तिथे त्यांनी नमाज पठण केलं.
फैसल आणि चांद यांचा नमाज पठण करतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक हिंदू संघटनांनी याला विरोध केला. याप्रकरणी मंदिराचे सेवेकरी कान्हा स्वामी यांच्या तक्रारीवरून मथुरा पोलिसांनी चार जणांविरोधात १५३ -ए, २९५, ५०५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी तक्रार दाखल करणाऱ्या कान्हा स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांसोबत स्वामी यांचं बोलणं झालं होतं. पण या दोघांनी नमाज पठणासाठी कोणताही परवानगी घेतली नव्हती. त्यांनी खोटं बोलून नमाज पठण केलं आहेस असा आरोप स्वामी यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- दुर्देवाने राज्य सरकार कुठल्याच विषयात गंभीर नाही – प्रविण दरेकर
- भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीत आणि उत्पन्नात सातत्याने होतेय भरघोस वाढ
- पंचनाम्याचे दुस-यांदा नाटक कशासाठी..? शेतकऱ्यांना सरसकट मदत करा-भाजपा
- भ्रष्टाचारी एकनाथ खडसेंना आमदार करू नका; दमानिया यांनी घेतली थेट राज्यपालांची भेट
- काँग्रेसला नाराजीचा मोठा धक्का ! ‘हा’ दिग्गज नेता स्थापन करणार नवा पक्ष


