Share

सीडीला मुहूर्त नाहीच ? ईडी चौकशीबाबत खडसे म्हणाले…

Published On: 

मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी आता आणखीन वाढल्या आहेत. त्यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत १९ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. जमिनीच्या व्यवहाराशी चौधरी यांचा थेट संबंध असल्याने पुढील तपास आणि अधिक चौकशीसाठी आणखी कोठडी आवश्यक असल्याचे ईडीने सांगितल्यानंतर कोर्टाने ही वाढ झाली.

५ जुलै रोजी गिरीश चौधरी यांना अटक केल्यानंतर ईडीने एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. यावेळी खडसेंची तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली. तर, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना देखील ईडीने समन्स बजावल्याचं बोललं जात आहे. खडसेंच्या अडचणीत वाढ होत असल्याचं दिसून येत असून मुक्ताईनगरमध्ये समर्थकांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

‘ईडीची चौकशी सुरू आहे. त्यामुळे यावर बोलणे सद्या उचीत होणार नसून चौकशी पूर्ण झाल्यावर मी बोलेन,’ असं खडसे म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना जर ईडीची चौकशी माझ्या मागे लागली तर मी सीडी लावेन असं भाष्य करत खडसेंनी आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर, ईडीने खडसेंची चौकशी सुरु केल्यानंतर मात्र ते सीडी नेमकी कधी बाहेर काढणार असे सवाल उपस्थित होत आहेत. यासोबतच, खडसेंकडील सीडीमध्ये नेमकं काय आहे ? याबाबत देखील कायमच उत्सुकता असल्याचं दिसून येत असलं तरी अद्यापही खडसेंच्या सीडीला मुहूर्त न मिळाल्याचे दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!