Share

‘राजसाहेब जी जबाबदारी देतील ती स्वीकारणार’ ; अमित ठाकरेंचे सूचक विधान

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी काल सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे मनसेला पक्ष पातळीवर मोठी हानी झाली नसली तरी अध्यक्ष पदावरील नेता इतर पक्षात गेल्याने नकारात्मक संदेश गेला आणि माध्यमांमध्ये चर्चा रंगली आहे.

मात्र आता आदित्य शिरोडकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्याने आता मनसेच्या विद्यार्थी संघटनेचं अध्यक्षपद अमित ठाकरेंकडे जाण्याची शक्यता आहे. त्याबाबत लवकरच मोठी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अमित ठाकरे आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे तातडीने नाशिकला दाखल झाले आहेत.

यावर आता अमित ठाकरेंनी देखील सूचक विधान करून शिक्कामोर्तबच केले आहे. असे म्हणले तर वावगे ठरण नाही. अमित ठाकरे यांनी देखील मनसे विद्यार्थी सेनेच्या प्रदेशाध्यक्ष पद स्विकारण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र राज ठाकरे यांनी जबाबदारी दिली तरचं स्विकारू असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

आदित्य शिरोडकर यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यापार्श्‍वभूमीवर अमित यांना माध्यमांनी विचारले असता मनविसेचा प्रदेशाध्यक्ष होण्यास आवडेल, माझे नाव या पदासाठी घेतले जात असल्याने मला आनंद आहे. मात्र राज ठाकरे यांनी जबाबदारी दिली तरचं स्विकारेल अशी भुमिका घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!