Share

‘चंद्रकांत पाटलांच्या सल्ल्याने ईडी कारवाई करते’; जयंत पाटील यांचा आरोप

Published On: 

सोलापूर : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा धक्कादायक आरोप लावला होता. परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती. या प्रकरणी अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी केली जात असून त्यांच्या दोन्ही खासगी सचिवांना अटक केली आहे.

दरम्यान, अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कोट्यवधीच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. याआधी अनिल देशमुख यांच्या मुलासह पत्नीला देखील ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी बोलावलं होतं. यानंतर ईडीने मालमत्तेच्या जप्तीची कारवाई ही देशमुखांना मोठा धक्का मानला जात आहे. तर, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची देखील ईडीने तब्बल ९ तास कसून चौकशी केली होती.

ईडीच्या कारवायांवरून महाविकास आघडीतील नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला असून आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी याबाबत टीका केली आहे. ‘स्वायत्त संस्था असलेली ईडी भाजपच्या चंद्रकांत पाटलांच्या सल्ल्याने वागते हे निष्पन्न झालं आहे. विरोधी पक्षांशी सल्लामसलत करुन महाराष्ट्रात ईडी सारखी संस्था काम करतेय हे दुर्दैव आहे,’ असं भाष्य जयंत पाटील यांनी केलं आहे. ते सोलापुरातील पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!