Share

‘जनहितासाठी पाठिंबा, पण किमान राज्य सरकारने ‘या’ प्रश्नांची उत्तरे तरी द्यावीत’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. प्रचंड वेगानं होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर ताण येण्यास सुरूवात झाली आहे.यातूनच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

राज्यात पाच एप्रिलपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच दिवसा जमावबंदीचा आदेश जारी झाला आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत नवे निर्बंध लागू राहणार आहेत. याशिवाय शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत कडक लाॅकडाऊन राहणार आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला भाजपाने पूर्णपणे सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.

सरकारच्या निर्णयाला पाठिंबा जाहीर करतानाच ‘जनहितासाठी पाठिंबा पण किमान पाच प्रश्नांची उत्तरे तरी द्या,’ असं म्हणत भाजपाने ठाकरे सरकारला काही सवाल केले आहेत.महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा जाहीर करताना काही शंकाही उपस्थित केल्या आहेत.

भाजपने उपस्थित केले हे सवाल ?

कठोर निर्बंधांच्या काळात कोणत्या आरोग्य सुविधांची उभारणी करणार? रोज श्रम करून कमावणाऱ्यांच्या रोजगार,कमाईची व्यवस्था? या काळात राज्यात जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता, वितरण यांविषयीचा कार्यक्रम निश्चित केला आहे का? रुग्णांसाठी आवश्यक असलेली मदत केंद्रे व औषधे उपलब्ध करून देणारी व्यवस्था निर्माण केली आहे का? पैशाअभावी उपचारांविना कोणीही राहणार नाही याची हमी सरकार देईल का?

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!