🕒 1 min read
मुंबई : अंधेरी (पूर्व) पोट निवडणुकीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोणालाच वापरता येणार नाहीय. एवढंच नाही तर कोणत्याच गटाला शिवसेना पक्षाचं नावही लावता येणार नसल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यानंतर अनेक राजकीय पक्षनेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आयोगाच्या निर्णयानंतर भाजप पक्षाचे नेते केशव उपाध्ये यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
काय म्हणाले केशव उपाध्ये ?
शिवसेनेचे चिन्ह मुख्यमंत्री पदाच्या लोभाने गेले असल्याचं, म्हणत केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच हल्ला केला आहे. यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, ख्यमंत्रीपदापायी मती गेली, मतीविना हिंदुत्वनीती गेली, नीतीविना जनता गेली. जनतेसोबत सैनिक गेले, सैनिकानंतर चिन्ह व पक्षही गेला, इतके अनर्थ मुख्यमंत्रीपदाच्या लोभाने केले.
मुख्यमंत्रीपदापायी मती गेली
मतीविना हिंदुत्वनीती गेली
नीतीविना जनता गेली. जनतेसोबत सैनिक गेले
सैनिकानंतर चिन्ह व पक्षही गेला
इतके अनर्थ मुख्यमंत्रीपदाच्या लोभाने केले— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 9, 2022
तसेच, आयोगाच्या निर्णयानंतर आता दोन्ही गटांना स्वत:च्या पक्षासाठी नवीन नावाची आणि नवीन निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. सोमवारी, 10 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय आयोगाकडे सादर करण्याचे आदेश आयोगाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तर शिंदे गटाला दिलासा भेटला असून, शिवसेनेच्या वादातील अर्धी लढाई जिंकल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी करण्यात येत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- MNS | “उद्धव ठाकरे यांच्या कडे मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही तो म्हणजे…”; मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- Milind Narvekar | ‘तो’ फोटो शेअर करत मिलिंद नार्वेकरांनी सांगितले ठाकरे गटाचे चिन्ह
- Rohit Pawar | निवडणूक आयोगाच्या निर्णयावर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Naresh Mhaske | “ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे बनावट प्रतिज्ञापत्र सादर केले”, नरेश म्हस्केंचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
