Share

जातीय सलोखा राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका- अजित पवार

Published On: 

पुणे : त्रिपुरातील कथित घटनेवरून गेले दोन दिवस महाराष्ट्र धुमसून निघाला आहे. महाराष्ट्रात मालेगाव आणि अमरावतीमध्ये त्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. याता या हिंसाचारावरून राजकारणही पेटले आहे. या दोन्ही ठिकाणी उसळलेल्या दंगलीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याचाच पुढचा टप्पा आज अमरावतीमध्ये पहायाला मिळाला. त्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जातीय सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे.

त्रिपुरामध्ये घटना घडली. त्यामुळे मालेगाव, अमरावती, नांदेड येथे जातीय दंगली उसळल्या आहेत. काही समाजकंटकांनी काहींनी त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. आपल्या परंपरेनुसार जातीय सलोखा राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका, असं अजित पवार यांनी आवाहन केलं आहे.

दरम्यान, त्रिपुरा राज्यात सुरु असलेल्या हिंसाचाराच्या अफवांचे लोण आता महाराष्ट्रातही पसरले आहे. त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात मुस्लिम धर्मीयांमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. शुक्रवारी राज्यातील विविध भागांत निषेध मोर्चे काढण्यात आले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!