🕒 1 min read
अमरावती : त्रिपुरातील कथित घटनेवरून गेले दोन दिवस महाराष्ट्र धुमसून निघाला आहे. महाराष्ट्रात मालेगाव आणि अमरावतीमध्ये त्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. याता या हिंसाचारावरून राजकारणही पेटले आहे. या दोन्ही ठिकाणी उसळलेल्या दंगलीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याचाच पुढचा टप्पा आज अमरावतीमध्ये पहायाला मिळाला. येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दंगलीवरून थेट सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.
1993 च्या दंगलीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता राहिला. आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार काही बोलणार नाहीत का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.
भाजप हे सॉफ्ट टार्गेट होतं. काही झालं की भाजपचा हात आहे असं बोललं जातं. परवाच्या तोडफोडीत कोणाचा हात होता, हे ही संजय राऊत यांनी सांगून टाकावं. कालची प्रतिक्रिया हिंदू मार नही खायेगा अशीच होती. ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. 1993 च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंसाठी पुढाकार घेतला नसता, तर मुंबईत हिंदू जिवंत राहिला नसता, पण आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार काही बोलणार नाहीत का, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
राज ठाकरेंनी एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या करू नये असे आवाहन केले. आपणही तेच आवाहन करत आहोत. कर्मचाऱ्यांना आत्मदहन हा पर्याय नाही. या आंदोलनातून मार्ग निघेल, असा आशावादही चंद्रकांत पाटलांनी यावेळी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘खरंच ‘हिंदू खतरे में है’ तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा, मोदी-शहांना जाब विचारावा’
- फडणवीसांचं ‘ते’ कृत्य म्हणजे देशद्रोह, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा- नाना पटोले
- मी एसटी कंडक्टरचा मुलगा आहे- प्रविण दरेकर
- राज कुंद्रा-शिल्पाच्या अडचणीत वाढ; व्यावसायिकाने केला फसवणुकीचा गुन्हा दाखल
- ‘काँग्रेसला बदनाम करण्याची सुपारी आमच्याच मित्रपक्षाने घेतली आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
