नवी दिल्ली : कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला गौतम गंभीर याने परखड सल्ला दिला आहे. गंभीर म्हणाला,भारतीय संघाने इतिहासात रमण्यापेक्षा येत्या ऑक्टोबरमध्ये होत असलेला टी-20 विश्वकरंडक तसेच 2023 सालच्या मुख्य विश्वकरंडक स्पर्धेला डोळ्यांसमोर ठेवत संघबांधणी सुरू केली पाहिजे.
भारताने 2011 साली विश्वकरंडक स्पर्धा जिंकली. त्यानंतर भारतीय संघाने आयसीसीने आयोजित केलेल्या एकाही मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवलेले नाही. केवळ आम्ही विश्वकरंडक जिंकला अशा आठवणींमध्ये रमण्यापेक्षा आगामी पाच वर्षांचे नियोजन केले गेले पाहिजे. सध्या भारतीय संघात अनेक नवोदित खेळाडू सरस कामगिरी करत आहेत.
त्यांच्याकडे गुणवत्ताही आहे. मात्र, त्यांच्याकडून लक्षवेधी कामगिरी करून घेण्यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. येत्या काळात अशीच संघबांधणी कोहलीला करावी लागणार आहे, असेही गंभीर म्हणाला. भारताने २०११ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील २ एप्रिल २०११ ला विश्वचषक जिंकला होता. या विजेतेपदाला उजाळा देतानाच भारतीय संघाने पुढील विश्वकरंडक स्पर्धेबाबत गांभीर्याने संघबांधणी केली पाहिजे, असे गंभीर म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या
- लोकांचा जीव महत्त्वाचा की राजकारण हे भाजप नेत्यांना कळायलं हवं – नवाब मलिक
- कंपाउंडरच्या यशानंतर आता जयंत पाटलांचा चेहरे पाहून कोरोना सांगण्याचा नवा फॉर्म्युला- भाजप
- मोठी बातमी : लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागल्यास सहकार्य करा; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फोन
- धार्मिक नियमांचं पालन करत चेन्नईतील ‘या’ खेळाडूने मागितली वेगळी जर्शी
- ‘विराट कोहलीचा RCB संघ यंदा प्लेऑफ गाठणार नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

