🕒 1 min read
मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनसह कडक निर्बंध लावले जात असतानाच पंढरपूर मध्ये मात्र पोटनिवडणुकीच्या प्रचारसभांचा धुरळा उडाला आहे.
एका बाजूला राज्य मोठ्या संकटाशी सामना करत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधताना सांगितलं आहे. मात्र, महाविकास आघाडीमधील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाचा पुरता विसर पडल्याचं आता समोर येतंय.
पंढरपूरची पोटनिवडणूक राजकीय प्रतिष्ठेची बनली असून प्रचार सभांना देखील वेग आला आहे. एकीकडे राज्यात कोरोना वाढत असल्याने निर्बंध लावण्यात येत असताना राजकीय पक्षांना मात्र याचं भान नसल्याचं समोर येत आहे. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचारसभेला सोशल डिस्टंसिंग, मास्क घालणे अशा कोरोना प्रतिबंधक नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
इतकेच नाही तर उपस्थितांसह राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी देखील मास्क काढून भाषण केलं. ‘सर्वांचे चेहरे बघितल्यावर कोरोना जगात नाही याची खात्री पटलेली आहे, म्हणून मीही मास्क काढून बोलतोय,’ असं बेजबाबदार वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे.
कपौंडरच्या यशानंतर आता @Jayant_R_Patil यांचा चेहरे पाहून कोरोना सांगण्याचा नवा फार्म्युला. – 'तुमचे चेहरे पाहून कोरोना नाही असं वाटतं, कोरोना जगात नाही याची आता खात्री पटतेय, म्हणून मी पण मास्क काढून बोलतो', राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं वक्तव्यं pic.twitter.com/o5R0vJrR81
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 4, 2021
जयंत पाटील यांच्या या विधानावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘कंपाउंडरच्या यशानंतर आता जयंत पाटील यांचा चेहरे पाहून कोरोना सांगण्याचा नवा फॉर्म्युला.’ असा घणाघात केशव उपाध्ये यांनी केला आहे. यासोबतच, त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना खासदार संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- लोकांचा जीव महत्त्वाचा की राजकारण हे भाजप नेत्यांना कळायलं हवं – नवाब मलिक
- कोरोना नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊनचा विचार करावाच लागेल, अजित पवारांचा इशारा
- लसीचे दोन डोस घेऊनही औरंगाबाद मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय कोरोना पॉझिटिव्ह
- विवाहित पुरुषासाठी वेडं झालेलं पाहिलं आहे का?, रेखा यांनी दिल भन्नाट उत्तर
- ‘चंद्रकांत पाटील भित्रा माणूस, त्यांना पुण्यात महिलेच्या जागेवर उभं राहायला लागलं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
