चेन्नई : येत्या ९ एप्रिल पासुन आयपीएलचे नवे सत्र सुरु होत आहे. यंदाच्या सत्रातील पहिला सामना हा रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये ९ एप्रिल रोजी होणार आहे. मात्र यंदा सर्वांचे लक्ष असणार आहे चेन्नई सुपर किंग्स संघाच्या कामगीरीकडे. कारण मागील आयपीएल सत्रात चेन्नईच्या संघाची कामगीरी ही खुपच निराशाजनक राहिली होती. पहिल्यांदाच चेन्नईचा संघ साखळी फेरीतच बाहेर पडला होता. आणि गुणतालीकेतही सर्वात खाली होता. यंदाच्या आयपीएल सत्रासाठी अनेक खेळाडू हे आपआपाल्या संघाच्या सराव शिबीरात दाखल झाले आहे.
दरम्यान, इंग्लंडचा ऑल राऊंडर मोईन अली यंदा चेन्नई सुपर किंग्स टीमकडून खेळणार आहे. या टीमची जर्सी घालण्यापूर्वी मोईननं सीएसकेकडं एक खास मागणी केली होती. सीएसकेनं ती मागणी मान्य करत मोईनला वेगळी जर्सी देण्याचा निर्णय घेतला आहे. मोईनच्या विनंतीवरुन त्याला अल्कोहल ब्रँडचा लोगो काढून टाकणार आहे.
मोईन अलीने धार्मिक नियमांचं पालन करत कधीही अल्कोहलच्या ब्रँडचं प्रमोशन करत नाही. इंग्लंडकडून खेळतानाही तो आणि आदिल रशिद अल्कोहलपासून आणि त्या ब्रँडचं प्रमोशन करणे टाळतात. सीएसकेच्या जर्शीवर एक अल्कोहल ब्रँड आहे. मोईननं टीम मॅनेजमेंटकडं जर्सीवरुन हा लोगो हटवण्याची मागणी केली होती. ती मॅनेजमेंटनं मान्य केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लोकांचा जीव महत्त्वाचा की राजकारण हे भाजप नेत्यांना कळायलं हवं – नवाब मलिक
- कंपाउंडरच्या यशानंतर आता जयंत पाटलांचा चेहरे पाहून कोरोना सांगण्याचा नवा फॉर्म्युला- भाजप
- मोठी बातमी : लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागल्यास सहकार्य करा; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फोन
- निःशब्द भावनांना बच्चू कडू यांची साथ, राख झालेल्या संसाराला दिला मदतीचा हात
- ‘विराट कोहलीचा RCB संघ यंदा प्लेऑफ गाठणार नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

