मुंबई : येत्या ९ एप्रिल पासून आयपीएलचे १४वे सत्र सुरु होत आहे. सर्व संघ स्पर्धेच्या तयारीला लागले आहे. यंदाच्या आयपीएलचा सलामीचा सामना हा आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघ आगामी काही भारतीय खेळाडूंमध्ये सामील होऊन आवश्यक संतुलन स्थापित करुन आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये चॅम्पियन बनण्याची तयारी दर्शवित आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात अव्वल खेळाडू उपस्थिती असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजेतापद मिळवता आलेले नाही. या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू जिकंण्याच्या वृत्तीने मैदानात उतरणार आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात एबी डिव्हिलियर्स सारखा दिग्गज फलंदाज आहे. परंतु एवढे चांगले खेळाडू संघाला असताना देखील आरसीबीला एकदाही विजय मिळवता आलेला नाही. पुढचा विचार करता संघ जर या दोघांवर जास्त अवलंबून राहिला तर अशा परिस्थितीत संघ कधीही संतुलित राहू शकणार नाही. म्हणून आता या संघात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसनला सामील करून घेतले आहे. त्यामुळे आता आरसीबी संघ भक्कम असल्याचे दिसत आहे.
विराटचा संघ पाहता अनेकांना असं वाटतंय की, विराटचा संघ यंदा आयपीएल स्पर्धा जिंकू शकतो, तर काहींच्या मते हा संघ प्ले ऑफपर्यंत स्पर्धेत टिकेल. तर दुसऱ्या बाजूला माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट समीक्षक आकाश चोप्रा याच्या मते रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघ यंदा आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचणार नाही. भारताचा माजी फलंदाज आणि कॉमेंटेटर आकाशने आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हटलं आहे की, या हंगामात आरसीबी त्यांच्या मागील हंगामातील कामगिरीची पुनरावृत्ती करू शकणार नाही. तो म्हणाला, “मला वाटते की यावेळी हा संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय होऊ शकणार नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
- लोकांचा जीव महत्त्वाचा की राजकारण हे भाजप नेत्यांना कळायलं हवं – नवाब मलिक
- कंपाउंडरच्या यशानंतर आता जयंत पाटलांचा चेहरे पाहून कोरोना सांगण्याचा नवा फॉर्म्युला- भाजप
- मोठी बातमी : लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागल्यास सहकार्य करा; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फोन
- निःशब्द भावनांना बच्चू कडू यांची साथ, राख झालेल्या संसाराला दिला मदतीचा हात
- ‘चंद्रकांत पाटील भित्रा माणूस, त्यांना पुण्यात महिलेच्या जागेवर उभं राहायला लागलं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

