Share

‘बाईपण भारी देवा’ केदार शिंदे यांचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Published On: 

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अनेक चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून विविध सुंदर असे विषय प्रेक्षकांच्या भेटस आणले आहेत. त्यांचे अनेक चित्रपट नाटक खूप गाजले. परंतु आता पुन्हा एकदा केदार शिंदे यांचा नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

‘बाईपण भारी देवा’ असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून त्यांच्या या नव्या चित्रपटाच्या अनोख्या नावामुळे या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मिडियावर प्रदर्शित केले गेले असून याची सध्या चर्चा होत आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी वैविध्यपूर्ण कलाकृतीमधून विनोदी, कौटुंबिक विषय मांडले आहेत. त्यांच्या चित्रपटांचा प्रेक्षक सहकुटुंब आस्वाद घेतात, यामुळे ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाबद्दल अबालवृद्धांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

निर्मात्या माधुरी भोसले यांच्या स्क्रीनशॉटस् या संस्थेची पहिली निर्मिती असलेला हा चित्रपट आहे. गॉगल आणि त्यावर चंद्रकोर असलेल्या या पोस्टरवरून चित्रपटाच्या वेगळेपणाचा अंदाज येतो. तसेच ‘नो टेन्शन, फुल्ल टशन’ या कॅच लाईनमुळे प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दल अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

या चित्रपटामध्ये आणखी कोणते कलाकार असणार आहेत याबाबत अद्याप माहिती दिली नाही. ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट २८ मे २०२१ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!