नांदेड – नांदेड जिल्ह्यात दि.२५ मार्च पासून ०४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी लॉकडाउनच्या निर्णयावर सडकून टीका केली. भूमीपत्रांनी नायगाव येथील हेडगेवार चौकात लॉक डाऊनच्या नियमावलीची होळी करून, नांदेड-हैदराबाद रस्ता रोखला.
पांडुरंग शिंदे म्हणाले की,माझे कुटुंब… माझी जबाबदारी.. घरी रहा..सुरक्षित रहा.. हे म्हणणे सोपे आहे पण घरी राहून काय खायचं..माती ? कोरोनाच्या तिरडीवर बसून जिल्हा प्रशासन असे मूर्ख निर्णय घेत आहे. लॉकडाऊन मुळे हातांवर पोट असणाऱ्या लोकांनी कसे जगायचे? त्याचे पोट कसे भरायचे ? त्याचे कुटूंब कसे जगेल यांचं विचार केला का? असा देखील त्यांनी सवाल केला आहे.
पांडुरंग शिंदे म्हणाले की,गेल्या वर्षभरा पासून आधीच जिल्ह्यातील तमाम सामान्य जनता झळ सोसत आहे. जिल्हा बंदी किंवा लॉक डाऊन हा कोरोनावरील पर्याय नाही असे केल्याने तमाम सामान्य जनता,शेतकरी, शेतमजूर, कामगार यांना बेकारी,बेरोजगारी,उपासमारी या अशा एक ना अनेक समस्यांनी तर्सावून सोडले आहे.
कोरोना हा आजार श्रीमंत लोकांना होणार आजार आहे. आम्हा भारतातील (खेड्यातील) म्हणजे गरिबांना तो होत नाही. खरंच आमची काळजी असेल तर सर्व कर्मचाऱ्याचा अर्धा पगार कमी करून जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या खात्यात जमा करावा असेही कर्मचारी पूर्व वेळ काम करत नाहीत , खुशाल लॉक डाऊन करत राहा अशी टीका शिंदे यांनी केली. यावेळी ,हिंद युवा परिषदेचे संयोजक रणजित देशमुख,भाजपाचे युवा नेते गजानन पा. चव्हाण, युवा नेते निळंकंठ ताकबीडकर ,राजेश वाघमारे वंजारवाडीकर व शेतकरी, शेतमजूर, महिला, व्यापारी कामगार उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत राणेंचा शिवसेनेला धोबीपछाड
- ‘काँग्रेसने १०० कोटींच्या तफावतीचा आरोप केल्याने आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण ?’
- मोठी बातमी : महाराष्ट्रातील ‘या’ १४ जिल्ह्यांमध्ये लागणार लॉकडाऊन?
- प्राजक्ता गायकवाडच्या क्युट कॉस्ट्यूम डिझायनरला पाहिलंत का?
- अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल सारखा गॉगल घालून सेल्फीची आनंद महिंद्रा यांची पोस्ट व्हायरल


